जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुस्का येथे अनिस केली जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी- धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुस्का येथे दिनांक 12 ऑगस्ट 2015 महराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने बुवाबाजी अनिष्ट रुढी परंपरा यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने भोळ्या भाबड्या जनतेची कशी फसवणूक होते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विलास निंबोरकर सर गडचिरोली ,सुधा चौधरी मॅडम गडचिरोली ,अल्का गुरनुले गडचिरोली यांनी सविस्तर प्रयोगातून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुस्का व महाराष्ट्र विद्यालय मुस्का यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Related News
शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार – यशवंत महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन
2 days ago | Arbaz Pathan
शिक्षणाबरोबर खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक–इमरान राही”
31-Aug-2025 | Sajid Pathan